शिवसेनेतर्फे विरारमध्ये भव्यआरोग्य शिबिर


  • विरार ः प्रतिनिधी
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिरारोड येथील लाईफ लाईन रुग्णालय व इन्फिगो आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने विरार-मनवेलपाडा शिवसेनेतर्फे विरार मनवेलपाडा येथील नाना-नानी पार्क नाका येथे शनिवार दि. *31 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनवेलपाडा नाना-नानी पार्क येथे आयोजित शिबिरात मिरारोड येथील लाईफ लाईन रुग्णालय यांच्यावतीने* हृदय, किडनी, कॅन्सर, डोळे तसेच मोफत रक्त तपासणी, सी.बी.सी, कॉलेस्ट्रल, याद्दच्छिक साखर, क्रिएटीन (स्पेट्रम प्रयोग शाळा) व इतर ऑपरेश करण्यात येणार आहेत. तर विरार पश्चिमेकडील इन्फिगो आय केअर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर शनिवार सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती, विरार उपशहरप्रमुख विनायक भोसले यांनी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री.भोसले यांनी केल आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed