नालासोपारा :- वसई विरार क्षेत्रामध्ये रस्ते, गट्टारे, गटारावरील झाकणे यांचा दुरावस्थामुळे वारंवार दुर्घटना घडत आहेत. अनेक नागरीकांना आपला जीव गमवावालागत आहे. 17 जुलै 2021 रोजी झालेल्या मुसळधार पावसात काही गटाराचे झाकण नसल्यामुळे अनमोल सिंह नावाचा एका ४ वर्षीय अल्पवयीन बालकाचा बिलालपाडा येथे महानगरपालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचा निष्काळीपणामुळे गटारात पडून दुर्दैवी मृत्यू झाला व एका परिवाराचा कुलदीपक विझून गेला. दहा दिवस उलटूनही त्या बालकाचा मृतदेह सापडलेला नाही.
अशाच प्रकारे गेल्या वर्षी सुध्दा एका परिवाराने आपल्या लहान बालकाचा जीव गमवला होता. तरीही महापालिकेचे अधिकारी अशा घटनेची गांभीर्याने दखल घेताना दिसून येत नाही. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्डामुळे अनेक दुचाकी वाहक दुर्घटनाग्रस्त होतात व आपल्या जीवसुद्धा गमावतात. यामुळे सदर प्रकरणात सखोल चौकशी करून महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यावर अनवधानाने केलेल्या हत्याचा विरोधात कायदेशीर कारवाई करावी तसेच मुलाच्या आई वडलांना संबंधित अधिकाऱ्याकडून नुकसान भरपाई व्यावी असे पत्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी मंगळवारी तुळींज पोलिसांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *