
–
-नायगावच्या Axis बँक मध्येही केला लाखों रुपयांचा अपहार
-आरोपी अनिल दुबेने १ वर्षांपासून नायगावच्या axis बँकेचा ब्रांचहेड
-२६ लाख ८६ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अँकर- विरार च्या icici बँकेत दरोडा व हत्या केल्याप्रकरणी अटक असलेला मॅनेजर आरोपी अनिल दुबे यावर वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत दरोडा टाकण्याआधी हा आरोपी गेल्या एक ते दीड वर्षांपासून नायगावच्या ऐक्सिस बँकेत ब्रांच मॅनेजर या पदावर कार्यरत होता. दरम्यान कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर असल्याने त्याने दरोडा टाकन्याचा प्लॅन करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने बँकेतील योगिता महिला कर्मचाऱ्याची हत्या केली होती..पोलिसांनी त्याला अटक केलीय.. दरम्यान या आरोपीने axis बँकेलाही चुना लावल्याचे उघड झाले आहे. बँकेत जमा झालेल्या २६ लाख ८६ हजार रुपायांचा अपहार केल्याची तक्रार बँकेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. वालीव पोलीसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.