

प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य,
पालघर, वसई विरार महानगर पालिका क्षेत्र आणि संपूर्ण महिला आघाडी यांच्या प्रयत्नाने विरार मधील नालेश्वर मधील राहणाऱ्या किन्नर समुदायाला पहिलं वैक्सीन कोविशिल्ड देण्यात आली. ही लस वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून व बहुजन वंचित आघाडी पालघर जिल्हा व वसई विरार महानगर पालिका क्षेत्र यांच्या पुढाकाराने देण्यात आली. डॉ. धनंजय विश्वकर्मा आणि डॉ सुनीता यांनी मोलाचे सहकार्य दिले. त्या बद्दल वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. महिला अध्यक्ष गीता जाधव, कोषाध्यक्ष सारिका सकपाल, सहसचिव साक्षी जाधव, विरार पूर्व विभाग प्रमुख मा. संतोष कवडे व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते, दिलीशा वाघेला लोकसेवा सामजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, खुशी मेहता लोकसेवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष मेहनत घेतली.