
विधान परिषदचे आमदार प्रसाद लाड यांनी नारळ वाढवून केला शुभारंभ
वसई: कोकणात आलेल्या पुरामुळे कोकणवासीयांसाठी जीवनावश्यक पाठवल्या जाणार असून त्यासाठी मदत करावी असे आवाहन वसई-विरारकरांना जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला वसई-विरारकरांनी भरघोस प्रतिसाद देत एक नव्हे तर 2 ट्रक भरतील एवढे जीवनावश्यक वस्तू कोकणवासीयांसाठी दिल्या. विधानपरिषदचे आमदार प्रसाद लाड यांनी नारळ वाढवून हा ट्रक रवाना केला.
यावेळी प्रसाद लाड यांनी बोलताना, मी वसई-विरारच्या जनतेचे आभार मानतो व संपूर्ण समान कोकणातील शेवटच्या गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचेल यासाठी नक्की प्रयत्न केले जातील असे यावेळी ते म्हणाले.
उत्तम कुमार यांनी बोलताना, वसई-विरारकर हे प्रत्येक वेळी अशा प्रसंगात धावून येत असतात यापूर्वी ही केरळमध्ये आलेल्या महापूर तसेच कोल्हापूर मध्ये आलेला पूरावेळी वसई -विरारच्या जनतेने मोठ्याप्रमाणात मदत केली होती व त्याचा ट्रक मी स्वतः जाऊन गरजू नागरिकांना त्याचे वाटप केले होते.
यावेळी प्रसाद लाड यांच्या हस्ते ज्यांनी मदत केली अशा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधे, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, ब्लिचिंग पावडर, सॅनिटाईजर, सॅनिटरी नॅपकिन, धान्य, मास्क, साबण, मेणबत्ती आदी वस्तूंचा समावेश होता. दुसरा ट्रक मंगळवार 10 ऑगस्ट 2021 रोजी पाठवण्यात येणार आहे, ज्या कोणास मदत द्यावयाची असल्यास 9323528197 या क्रमांकावर संपर्क साधावा असे उत्तम कुमार यांच्याकडून सांगण्यात आले.