
वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील पेल्हार विभागात सध्या महापालिकेच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक गैरसोयींना पेल्हारवासियांना सामोरे जावे लागत आहे. अनधिकृत बांधकामांमुळे आधीच आदिवासी बांधवांच्या भुखंडांवर गंडांतर आले आहे, त्यात महापालिकेकडून नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. मागील काही कालावधीपासून अंत्यविधीसाठी असलेली पेल्हार-जाबरपाडा येथील स्मशानभूमी ची दुरावस्था झाली आहे. याबाबत महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष पाहता पेल्हारचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भुरकुंड यांनी स्वत: पुढाकार घेऊन या स्मानभुमीची दुरूस्ती केली. खराब झालेले पत्रे बदलण्याबरोबरच महापालिका सफाई कर्मचार्यांच्या सोबतीने त्यांनी आजुबाजूचा परिसरदेखील स्वच्छ केला. गणेश भुरकुंड यांनी सामाजिक दातृत्वाची भावना जागी ठेवून स्वखर्चाने स्मशानभूमीची डागडुजी केल्याने पेल्हार – जबरपाडा/ भिडयाचापाडा/ सागपाडा वासीयांनी गणेश भुरकुंड आणि सम्राट प्रतिष्टान चे आभार मानले .

