
७ रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असणारे रुग्णालय ठरले ‘सर्वोत्कृष्ट’
नालासोपारा(प्रतिनिधी)- वसई विरार मधील वादग्रस्त विनायका नामक रुग्णालयाचा नुकताच राज्यपालांच्या हस्ते गौरव तसेच त्या रुग्णालयाला पालघर जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट’ रुग्णालयाचा पुरस्कार ३१ जुलै रोजी एका हिंदी वृत्तपत्र समूहा तर्फे आयोजित करण्यात एका कार्यक्रमात देण्यात आला.या कार्यक्रमात
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुध्दा जातीने उपस्थित होते. परंतु या सत्कारा मुळे वसई विरार मधील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून या सत्कारा विरोधात
भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बरोट यांनी आक्षेप घेतला आहे.तसेच या रुग्णालयाला देण्यात आलेला पुरस्कार पुन्हा परत घेण्याची मागणी केली आहे.
विनायका रूग्णालय मध्ये दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी प्राणवायू अभावी ७ रुग्णांनी आपले प्राण गमावल्याचा आरोप मृतांच्या परिवारानी केला होता आणि या प्रकरणात चौकशी समितीही नेमण्यात आली होती. तसेच वसई विरार महानगरपालिके मार्फत क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये सुद्धा सदर रूग्णालय द्वारा कोरॉना काळात ४४ रुग्णांकडून चाळीस लाख दोन हजार तीनशे चौतीस रुपयांची लूट केल्याचा ऑडिट रिपोर्ट मधून समोर आले होते.शिवाय कोरोना काळात विनायका रुग्णालयावर रुग्ण आणि त्यांचा नातेवाईकांकडून आर्थिक लूट केले असल्याचे गंभीर आरोप अनेकवेळा उगड झाले आहे.
आणि अशा रुग्णालयाल आरोग्यमंत्र्यां च्या हस्ते पुरस्कार देणे हे सर्वसामान्य जनतेचा मनामध्ये संभ्रम निर्माण करणारा प्रसंग आहे.विशेष म्हणजे याठिकाणी ७ जणांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांची व हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्या ऐवजी त्या रुग्णालयाला ‘सर्वोत्कृष्ट’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा नसून याचं आपण गांभीर्याने विचार करून ज्या समूहा तर्फे हा आपल्या हस्ते देण्यात आलेला पुरस्कार आहे तो तात्काळ परत घेण्याची विनंती करण्यात यावी. तसेच जर संबंधित विभागाने आपली दिशाभूल केली असेल तर त्याच्यावर सुध्दा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचा शासन आणि प्रशासनावर विश्वास कायम राहील.असे मत बरोट यांनी दैनिक महासागर कडे बोलताना व्यक्त केले.