
आपल्या वॉर्डातील कायदा सुव्यवस्था व सुरक्षा बाबत महिला अध्यक्षा अभिलाषा वर्तक यांनी माणिकपूर पोलिस स्टेशन वर दिनाक २०/०३/२०२१ रोजी रीतसर लेखी तक्रार केली होती. त्यात आपल्या विभागातील सी सी टीव्ही कॅमेरे चां कंट्रोल हा सुरक्षित हाती असला पाहिजे . त्या वर पोलिसांनी नियत्रंण ठेवावं असे कळवले होते. तरी देखील आज आपल्या साकाई नगर येथे एका महिलेची सोनसाखळी सकाळी पावणेसात च्या सुमारास हिसकावून नेली. आता सदर सी सी टीवी कॅमेरे बंद असल्याचे समजले की चोरी च्या उद्देशाने बंद केले गेले हा तपासाचा विषय आहे आणि त्या अर्थाने आज पोलिसांनी आपल्या गावातील तथाकथित नेत्यांना चांगलेच खडसावले आहे. सी सी टीव्ही ची योग्य निगा राखणे हे ज्यांनी बसवले त्याची जबाबदारी होती. परंतु आयजी च्या जीवावर बायजी उदार त्या प्रमाणे व्यापाऱ्याच्या जीवावर स्वतःचा प्रचार प्रसार करणारे पिवळे बेडूक आज पोलिसा समोर उघडे पडले. या बाबत भारतीय जनता पक्षाने पोलिसांना रीतसर तक्रार करुन सी सी टीव्ही कॅमेरे चे नियत्रंण घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेवून सांगितल होत तरी देखील पोलिसांनी त्या बाबत दुर्लक्ष केले या बाबत जे जबाबदार आहेत त्यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्ष करणारं आहे.