
प्रतिनिधी : वसई तहसील अंतर्गत माणिकपूर मंडळ गोखिवरे तलाठी कार्यक्षेत्रात मधुबन येथे अवैध माती भराव प्रकरणात वसई तहसील कार्यालयातील मोठ्या अधिकाऱ्याने फार मोठी तोडपाणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई तहसील अंतर्गत माणिकपूर मंडळ गोखिवरे तलाठी कार्यक्षेत्रात मधुबन येथे अवैध माती भराव प्रकरणी माणिकपूर मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दि. ३/५/२०२१ रोजी अहवाल दिला असून सदरबाबत अद्यापपर्यंत तहसील कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात आमच्या सूत्रांकडून खात्रीलायक माहिती हाती आली आहे की, सदर प्रकरणी कारवाई न करण्याकरिता तहसील कार्यालयातील एका मोठ्या अधिकाऱ्याने मोठी तोडपाणी केली आहे. सदर प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने सखोल निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी.
अवैध माती भरावाबाबत जबाब पंचनामे करू नयेत असे अलिखित आदेश वसई तहसीलदार कार्यालयाकडून सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले गेले आहेत. एखाद प्रकरणात प्रचंड दबाव आल्यानंतरच जबाब पंचनामे दिले जातात. पंचनामे दिले गेल्यानंतर ही तहसीलदार कार्यालयाकडून पुढील कारवाई होत नाही. नोटिसा काढल्या जात नाहीत. फार मोठा भ्रष्टाचार होत आहे. अधिकारी लाच खाऊन स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यात मश्गुल आहेत. सरकारी महसूल बुडतोय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही.
मधुबन येथील अवैध माती भराव प्रकरणी माणिकपूर मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दि. ३/५/२०२१ रोजी अहवाल दिला असून अद्यापपर्यंत नोटीस बजावण्यात आलेली नाही. सदर ठिकाणी अवैध माती भराव करणाऱ्या विकासकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी अधिकाऱ्यांना तुम्ही कितीही लाच दिली तरी शेवटी तुम्हाला शासकीय महसूल भरायचाच आहे. आणि तुमच्यावर गुन्हे ही दाखल केले जातील. अधिकारी काय हात वर करून मोकळे होतील. अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईलच. सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याकरिता मुख्यमंत्री व अन्य संबंधितांना तक्रारी दिल्या आहेत. कारवाई केल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.