
रानगावच्या एका दिड वर्षाच्या मुलाला विषारी सर्पदौश झाला आणि त्याला महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयानी जीवनदान दिले. आपल्या आजी बरोबर एक दीड वर्षाचा मुलगा सकाळी शेतात गेला असताना तिथे त्याला सकाळी ८ वाजता एका विषारी सर्पाने दौश केला आणि त्याला तातडीने त्याला वसई -विरार शहरमहानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयात भरती करण्यात आले, दौंश झाल्यापासून ते रुग्णालयात आणेपर्यंत २.३० तास उलटले होते आणि ह्यावेळेत विष दिड वर्षाच्या ताण्याबाळाच्या संपूर्ण शरीरात पसरले होते, कारण त्याच्या हिरड्यांमधून सुद्धा रक्तस्त्राव होऊ लागला होता ह्यावरून सर्प विषारी होते हे कळाले, बाळाला मध्ये मध्ये कॉन्व्हर्जन (आकडी) येत होते आणि त्याच्या सर्व रक्त तपासण्या करून त्याच्यावार योग्य उपचार करण्यात आले, उपचारासाठी २० ASV (अँटी स्नेक वेनम) देउन डॉ. भक्ती चौधरी आणि टीमने विशेष दखल घेउन बळावर उपचार करून त्याला जीवनदान दिले, बाळाची प्रकृती संध्याकाळी ८ वाजता स्थिर झाली असे डॉक्टरने सांगितले आणि बाळाच्या चेऱ्यावरचे हास्य पाहून नातेवकांनी महानगरपालिकेच्या वैद्यकीय टीमचे आभार मानले.
