
माझा नाव हरेश मीना पारेख. मी आनंद नगर, वसई (प.) येथील रहिवासी आहे. मी वयाच्या १४ व्या वर्षापासून
गणरायाचे छायाचित्र जमा करायला २००७ सालापासून सुरुवात केली व आत्तापर्यंत माझ्याकडे ४०००० पेक्षाही जास्त गणरायाचे छायाचित्र संकलन आहे. वसईचा महाराजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी अश्या प्रसिद्ध गणेश मंडळांचे सुद्धा माझ्याकडे छायाचित्रांचे अल्बम आहे. दरवर्षी भाद्रपद व माघी गणेशोत्सव दरम्यान येणाऱ्या वृत्तपत्रां मध्ये गणरायाचे छायाचित्रांचे कात्रण संकलन करून हा माझा छंद आजवर मी जपला आहे. हे कार्य करण्यास मला नेहमीच गणरायाचे व माझ्या आई वडिलांचे आशिर्वाद लाभले आहेत. माझ्या या छंदासाठी माझ्या घरचे इतर लोकांचे व मित्र परिवार व वसई आनंद नगर येथील पेपर स्टॉल वाल्यांची नेहमीच साथ लाभली आहे व त्यांचा ह्या कार्यासाठी नेहमीच ऋणी राहीन. माझ्या ह्या छायाचित्र संकलनाच कौतुक काही राजकीय, सामाजिक व कला क्षेत्राच्या दिग्गजांकडून झाला आहे. त्या मध्ये महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्ष नेते व माजी.मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, मनसे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार श्री.शरदचंद्रजी पवार, राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री.मनोहर जोशी, सुप्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा विजय खातू, लालबागचा राजाचे सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी, आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ व विविध सामाजिक संस्थांना मी भेट दिली आहे व त्यांच्या तर्फे सत्कार करण्यात आलेलं आहे. मला माझे छायाचित्र संकलन देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी ह्यांना ही दाखवायचे आहे. बाबासाहेब पुरंदरे फिल्म ॲक्टर नाना पाटेकर महाराष्ट्राचे म्युझिक डायरेक्टर अजय अतुल इतर लोकांनाही भेटायची माझी इच्छा आहे
ह्या छायाचित्र संकलनासाठी मला लोकमान्य विशेष सन्मान २०२१, दादासाहेब फाळके अवॉर्ड, गोल्डन ग्लोब अवॉर्ड, प्राईम इंडिया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं आहे आणि ओ.एम.जी बुक ऑफ रेकॉर्ड, आय.ई.ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. माझ्या सहकाऱ्यांची व मित्र परिवाराची आता हीच एक इच्छा आहे की मी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् व गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझ्या ह्या संकलनाची नोंद व्हावी व संपूर्ण वसई तालुकाचे नाव व्हावे.