◆ भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी दिल्ली भेट घेऊन दिले केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांना निवेदन!

वसई: भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाच्या भोंगळ कारभार संदर्भात केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन देऊन वसई-विरारकरांच्या व्यथा मांडल्या. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी तात्काळ वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरण डी. यांना संपर्क करून वसई-विरार परिसरात लसीकरणात नागरिकांचे हेलपाटे तात्काळ थांबवा! असे आदेश दिले.
उत्तम कुमार यांनी निवेदनाच्या माध्यमातून, मागील दोन महिने म्हणजेच जून-जुलैमध्ये वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा स्थानिक प्रशासन व राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे लसीकरणाचा दिवसेंदिवस तुटवडा जाणवू लागला आहे. स्थानिक नागरिक दररोज पहाटे 4 वाजेपासून लसीकरणकेंद्राच्या बाहेर लस मिळेल या अपेक्षेने रांगा लावत आहेत. स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती नागरिकांना मिळत नसल्यामुळे नागरिक रोज रांग लावतात व नंतर वैतागून घरी जातात… हा प्रकार वसई-विरारमध्ये सर्रास पहायला मिळतो आहे. वसई-विरारमध्ये कमालीचीबाब म्हणजे जुलै महिन्यात महापालिकेची मोफत सर्व लसीकरण केंद्रे बंद होती तर खासगी लसीकरण केंद्रे भरभरून विकत नागरिकांना लसी देत होत्या. यावेळी नागरिक हैराण होते की, खासगी केंद्रांना लसी मिळतात मग, पालिकेच्या मोफत केंद्रांना लसी का मिळत नाही? असा सवाल करत होते. मागील महिन्यात भाजपा वसई-विरारकडून विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ही केले होते.
तसेच यात अधिक भर म्हणून वसई-विरार महानगरपालिकेने सुरू असलेली 40 हीन अधिक लसीकरण केंद्रे बंद करून 25 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकाक्षेत्रात फक्त 4 जम्बो लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे आयोजन केले आहे. तरी आपण यात गांभीर्याने लक्ष द्यावे अशा विनंतीचे पत्र कपिल पाटील यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *