वंचित बहुजन आघाडी,पालघर जिल्हयाचे,सल्लागार कालकथित,रवींद्र भिवाजी मनोहर यांचे अल्पशा आजाराने व डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचार पद्धती मुळे एप्रिल महिन्यात दुःखद निधन झाले होते.
व याला सर्वस्वी,ब्रिथ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर श्री धर्मेंद्र दुबे व त्यांचा स्टाफचा निष्काळजी व बेजबाबदार पणा होता.मुळातच, हे हॉस्पिटल बेकायदेशीर व विनापरवाना सुरु होते.

कालकथित,रविंद्र मनोहर हे वसईतील आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते होते व श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे सर्वात जुने व निष्ठावंत कार्यकर्ते होते.

महानगर पालिकेच्या माध्यमाने,वसईतील,पंचवटी नाक्याचे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा नाम विस्तार करण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता तसेच धम्म दीप बुद्ध विहाराचे ते संस्थापक आहेत.

तहानलेल्या लोकांना,थंड व स्वच्छ पाणी मिळावे, म्हणुन,त्यांनी पंचवटी येथे पाणपोई सुरु केली आहे.

त्यांचे,आकास्मिक झालेले निधन हे त्यांच्या कुटुंबाला,मित्र परिवाराला व वंचित बहुजन आघाडी,पक्षाला एक जबरदस्त धक्का होता.कालकथित,रविंद्र मनोहर यांचे निधन हे आकस्मिक जरी असले, तरी ते अनैसर्गिक व डॉक्टरांच्या सदोष उपचार पद्धती मुळे झाले होते.सदरहू घटना,डॉक्टर या पेशाला कलंकित करणारी होती.

त्यांची मुलगी,मा.स्मिता रविंद्र मनोहर यांनी ब्रिथ केअर हॉस्पिटलचा भोंगळ व बोगस कारभार उघडकीस आणण्याचा निर्णय घेतला व हॉस्पिटल मॅनॅजमेण्ट विरुध्द लढ्याला सुरवात केली.

त्यांना,या लढ्यामधे,भीमा कोरेगाव,रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड प्रकरण व शहिद प्रवीण धुळे हत्या प्रकरण या गाजलेल्या खटल्यातले निष्णात वकील, कायदेतज्ञ व त्यांच्या वडिलांचे जुने सहकारी मित्र,ऍड.बी.जी. बनसोडे यांनी कायदेशीर मदत केली.वंचित बहुजन आघाडीतील,बेसिक व महिला आघाडीतील,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या लढ्याला चांगली साथ दिली.

मा.स्मिता रविंद्र मनोहर व वंचित बहुजन आघाडीच्या,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे व प्रयत्नामुळे,ब्रिथ केअर हॉस्पिटलची,महाराष्ट्र शासन व सिव्हिल सर्जेन पालघर,यांनी चौकशी केली व हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

काल दिनांक -12/08/21 रोजी,ब्रिथ केअर हॉस्पिटल, महानगर पालिकेने सिल केले आहे.प्राथमिक स्वरूपाचा निर्णय देऊन हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले आहे आणि अंतिम निर्णय येणे,बाकी आहे.

मा.स्मिता रविंद्र मनोहर व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनतीने व कठोर संघर्षाने अर्धी लढाई जिंकली आहे व यापुढेही, शेवटपर्यंत हा संघर्ष चालु राहील.

सरते शेवटी,मा.स्मिता रविंद्र मनोहर यांनी महाराष्ट्र शासन, पालघर सिव्हिल सर्जन,महानगर पालिका,ऍड.बी.जीं.बनसोडे सर,मित्र परिवार,वंचित बहुजन आघाडी,वसई विरार महानगर पालिका महिला आघाडी,वसई विरार महानगर पालिका कमिटी व पालघर जिल्हा कमिटीच्या, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *