
प्रतिनिधी :
वादग्रस्त व कलंकित डॉक्टर योजना जाधव यांच्यावर अनेक आरोप असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्यांची चंदनसार येथून तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे.
डॉ. योजना जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असून त्यांनी नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना २२ लाखाचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर तत्कालीन कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी डॉ. योजना जाधव यांच्याकडून साडे तीन लाख रुपये सरकारी तिजोरीत भरून घेतले होते. व दर महा २२,०००/- रुपये त्यांच्या पगारातून कापले जातात. अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकारी डॉ. योजना जाधव यांना तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त करणे पूर्णतः चुकीचे आहे.
भ्रष्टाचार हा शासकीय अधिकाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. भ्रष्टाचाराचा आरोप नाही असा एक ही अधिकारी सापडणार नाही.
नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना २००९ मध्ये पोलिओ लसीत २२ लाखांचा अपहार डॉ. योजना जाधव यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई वा गुन्हा दाखल न करता तत्कालीन कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी त्यांच्याकडून ३,५०,०००/- वसूल करून घेतले तर दर महा २२०००/- रुपये पगारातून कापले जातात. अशा कलंकित व भ्रष्ट अधिकारी डॉ. योजना जाधव यांना तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त करणे पूर्णतः चुकीचे आहे.
कोविड-१९ च्या लसीमध्ये डॉ. योजना जाधव यांचा गडबड घोटाळा चालू असून ४०० लसीमधून ५० लसी काढून घेऊन त्या काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचा आरोप आहे. सदर बाबत सखोल निष्पक्ष चौकशी व्हावी व योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असताना त्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे आवश्यक असताना वरिष्ठांकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचे काम चालू आहे.