

पर्यावरण संवर्धन समिती
आज हवामान बदलामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. पूर, दुष्काळ, प्रचंड गर्मी, प्रचंड थंडी, कोकणात कमी पाऊस तर आखाती देशात बर्फ कोसळतोय.
हिमालय, आर्टिक येथील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे पुढील ५० वर्षात समुद्रकिनारी वसलेले मुंबईसारखे शेकडो शहरे पाण्याखाली जातील असे भाकीत जागतिक पर्यावरण तज्ञ यांनी वर्तविले आहे.
आपल्या वसईत कधी नव्हे इतकी गर्मी व पाण्याची पातळी प्रचंड घटली असून पिण्याचे पाणी मिळेल की नाही अशी आणीबाणीची परिस्थिती आहे.
वरील गंभीर परिस्थती लक्षात घेता. पर्यावरण संवर्धन समिती द्वारे जन जागरण अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.
त्यासाठी जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ञ व प्रसिद्ध वक्ते मा. प्रा सागर धारा पुणे येथे पर्यावरण बदल या विषयावर व्याख्यानसाठी येत आहेत याची खबर पर्यावरण संवर्धन समितीला मिळाली आणि मा.प्रा.सागर धारा यांना संपर्क करून वसई व एकंदरित परिस्थिती विषद करताना वसईत काही मोजक्या पर्यावरण प्रेमी नागरिकांशी संवाद साधावा अशी विनंती करण्यात आली. मा. प्रा सागर धारा यांनी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपली धडपड लक्षात घेता वसईत येण्याचे मान्य केले.
विषय :- हवामान बदल, जागतिक परिणाम व उपाय
दिनाक :- सोमवार, १ जुलै २०१९
वेळ : – संध्याकाळी ६ ते ८
ठिकाण :- समाज सेवा मंडळ हॉल, निर्मळ.
विशेष सूचना :- पर्यावरण प्रेमी व पर्यावरणावर पुढील काळात काम करू इच्छिणऱ्यांसाठी सदर चर्चासत्र आहे. त्यामुळे सहकार्य अपेक्षित.