
मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते गुरुवार, दि.१९ ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या १) माता व बाल रुग्णालय बोळींज, व २) सोपारा जनरल हॉस्पिटल, नालासोपारा (प.), या नवीन रुग्णालयांचा लोकार्पण सोहळा तसेच १) आचोळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इमारत व २) बोळींज येथील म्हाडा कॉलनी ते श्रीप्रस्थ शनीमंदीर पर्यंत डी.पी. रस्ता विकसित करणे कामाचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न होणार आहे.
बोळींज माता व बाल रुग्णालयात १५० बेडची सुविधा करण्यात आली असून महिला व लहान बालकांसाठी जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, NICU यांची सुविधा करण्यात आली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता १०० जम्बो सिलिंडर प्रती दिन क्षमतेचा PSA ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात ५०० लिटर प्रती तास क्षमतेचा RO प्लांट तसेच ४०००० लिटर प्रती दिन क्षमतेचा ETP बसविण्यात आला आहे .
सोपारा जनरल हॉस्पिटल, नालासोपारा(प.) येथे २०० बेडची सुविधा करण्यात आली असून यापैकी ५० ICU बेड व १५० ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली आहे.तसेच म्यूकोरमायकोसीस रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता २०० जम्बो सिलिंडर प्रती दिन क्षमतेचा PSA ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात २०० लिटर प्रती तास क्षमतेचा RO प्लांट तसेच ४०००० लिटर प्रती दिन क्षमतेचा ETP बसविण्यात आला आहे .
तसेच आचोळे येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या G+३ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात येत असून या रुग्णालयात २०० बेडची सुविधा असेल. रुग्णालयात अपघात विभाग, फार्मासी, अलगीकरण कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूतीकक्ष, बालकांचे अतिदक्षता विभाग, फ़िजिओथेरेपी, डायलेसीस इ. विविध सुविधा असणार आहेत.
विरार पश्चिमेकडील बोळींज येथील म्हाडा कॉलनी ते श्रीप्रस्थ शनी मंदीर पर्यंत डी.पी. रस्ता विकसित करणेचे काम सुरु करण्यात येणार आहे.