
मुंबई – सुजाता साळवी
नुकतेच अतिवृष्टीमुळे मु. पो. पोसरे (बौद्धवाडी), तालुका खेड या गावामध्ये दरड कोसळून खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली.यामद्ये 7 घरे जमीनदोस्त झाली व 17 लोक मरण पावली. अशा आपत्ती ग्रस्त गावाकरिता
समता सामजिक प्रतिष्ठान (रजि) ठाणे-मुंढर आणि समता वाचनालय मुंढर तालुका गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने या गावाला भेट देऊन त्यांच्याकरिता जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानचे संचालक आयु. सुमित मोहिते यांच्या प्रयत्नाने TWJ या सामाजिक कार्यात तत्पर असणाऱ्या कंपनीकडून पाण्याचे बॉक्स व किट्स उपलब्ध झाले.यावेळी समता सामाजिक प्रतिष्ठानचे संचालक आयु. सुमित मोहिते, सुदर्शन गमरे, समता वाचनालयाचे अध्यक्ष आयु.अजित गमरे, सचिव उमेश जाधव, उपाध्यक्ष सुधीर गमरे, प्रशांत मोहिते, तेजस मोहिते, आदित्य गमरे यांनी आपत्ती ग्रस्त गावाला भेट देऊन गावची संपूर्ण पाहणी करून तेथील आपत्तिग्रस्त धम्मबांधवांना भेटून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले.
या संपूर्ण उपक्रमाला सौ. माधवी सुनिल सकपाळ आणि त्यांच्या सहकारी यांसकडून आर्थिक सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे समता सामाजिक प्रतिष्ठान रजि ठाणे मुंढर संचालित समता वाचनालय यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनोद जी. मोहिते आणि समता सामाजिक परिवाराकडून समता वाचनालय परीवाराकडुन विशेष आभार !!!!!