
विरार प्रतिनिधी : यशोदा फाउंडेशन तर्फे विरार येथे शाळेय विद्यार्थी वर्गास शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात यशोदा फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष लालबहादूर पाल महाराष्ट्र अध्यक्ष प्रेमचंद पाल, मुंबई विभाग चे सचिव शैलेंद्र पाल व कोषाध्यक्ष संतोष पाल यांच्या उपस्थितीत शाळेय विद्यार्थी वर्गास शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम संपन्न झाला. शिष्यवृत्ती प्राप्त झालेले विद्यार्थी प्रिती कनोजिया, अंजली यादव, निलेश यादव, खुशी तिवारी, अमर वर्मा, चंद्रमोहन सैनी, रूपा निषाद, प्रिया मदेशिया, अजय निषाद, शिवम प्रजापती, आकाश यादव व कार्तिक बेनबंशी या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. यशोदा फाउंडेशन सामाजिक संस्था असून शिक्षण, आरोग्य व अनेक असे सामाजिक उपक्रम घेण्यास संस्था अग्रेसर आहे. यशोदा फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष लालबहादूर पाल हे गरीब व गरजू लोकांना मदत करत असतात संस्थे तर्फे अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम संस्था घेत आली आहे. सदर संस्थे मार्फत आरोग्याची देखभाल, महिला सशक्तीकरण, गरीब गरजू मुलांसाठी मदत, शाळेय विद्यार्थी वर्गास शिष्यवृत्ती प्राप्त करून देने या कडे यशोदा फाउंडेशन संस्थेचे लक्ष असते