
प्रतिनिधी
विरार- ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे वसईत येत आहेत; मात्र नारायण राणे यांचा हा दौरा भाजप कार्यकर्त्यांना शक्ती देणारा आणि त्यांचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. यामुळे वसई महपालिकेत निश्चितच परिवर्तन घडेल, असा विश्वास वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी व्यक्त केला आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय वास्तव्य करून आहेत. यातील मोठा वर्ग नारायण राणे यांना मानणारा आहे. हा वर्ग आतापर्यंत आपली बहुमूल्य मते बहुजन विकास आघाडीच्या पारडीत टाकत आला आहे.
पण आता भाजपच्या निमित्ताने वसई-विरारमधील नागरिकांना पर्याय उपलब्ध झाला आहे. लोकप्रिय पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे व अन्य भाजप नेते भविष्यातील सशक्त भारतासाठी प्रयत्न करत आहेत.
भाजपची हीच शक्ती आगामी वसई-विरार महापालिका क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणार आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नारायण राणे ‘जन आशीर्वाद यात्रे’निमित्ताने करत असलेला वसई दौरा वसई-विरार पालिका निवडणुकीतील भाजपच्या विजयाची नांदी आहे, असे मत तसनीफ़ शेख यांनी व्यक्त केले आहे.