
दिनांक-21/08/21
वंचित बहुजन आघाडीचे,राष्ट्रीय अध्यक्ष व प्रणेते,श्रद्धेय,बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार,आदिवासी,ओबीसी,मराठा,आलुतेदार,बलुतेदार,, कोळी, कुणबी अशा विविध उपेक्षित व वंचित समाजाला जोडण्याच्या,पक्ष वाढीच्या धोरणानुसार तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षा,सौ.रेखा ताई ठाकुर व वरिष्ठ उपाध्यक्ष,डॉ.अरुणजी सावंत सर यांच्या निर्देशानुसार, ढेकाळे,डोंगरीपाडा,तालुका, पालघर तसेच लगतच्या परिसरातील ,शेकडो आदिवासी तरुणांनी
काल शुक्रवार दिनांक -20/8/21 रोजी,वंचित बहुजन आघाडीमधे,जाहीर पक्ष प्रवेश, पालघर जिल्हा अध्यक्ष,मा.हर्षदजी खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थित केला आहे.
यावेळी,वसई तालुका ग्रामीण अध्यक्ष,सन्मा.भरत अंकुश कुवरा व वंचितचे,आदिवासी समाजातील तरुण,डॅशिंग कार्यकर्ते,सन्मा.रामदास खेवरा हे देखिल हजर होते.
ढेकाळे,डोंगरीपाडा व लगतचा परिसर हा भाग पालघर तालुक्यातील बहुसंख्यांक आदिवासी समाज असलेला ग्रामीण भाग असुन आरोग्य,पाणी,रस्ते व वीज,या मानवी प्राथमिक गरजांपासुन कमालीचा उपेक्षित व वंचित राहिला आहे.यामुळे,येथील आदिवासी समाजाचा प्रशासन व स्थानिक नेते मंडळी विषयी प्रचंड आक्रोश व संताप आहे.
तसे पाहता,ढेकाले,डोंगरीपाडा हा भाग बोईसर विधानसभा क्षेत्रात येतो.या विभागाचे,विद्यमान,सन्मा.
आमदार हे बाविआचे आहेत.तसेच,माजी सन्मा.आमदार हे देखील बाविआचे होते,आत्ता,ते शिवसेनेत आहेत.विद्यमान व माजी आमदार,या दोन्ही आमदारांचे वात्सव्य व कार्यालय हे या भागातच असुन हे दोन्ही आमदार आदिवासी समाजातीलच आहेत.
तरी देखील,ढेकाळे,डोंगरीपाडा व आजूबाजूचा परिसर विकासापासून दुर्लक्षित राहिला आहे.येथील आदिवासी समाजाचे जिवनमान व आर्थिक स्थर हा खुप हलाकीचा आहे.येथील तरुणांच्या रोजगारीचे प्रश्न गंभीर आहेत.
मागील आठवड्यात,आपण देशाच्या, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले.तसेच,दोन दिवसापुर्वीच,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,सन्मा. उद्धवजी ठाकरे यांनी भव्य दिव्य पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मोठ्या जंगी स्वरूपात उदघाटन केले.
मुंबई सारख्या जगातील सर्वात मोठ्या व प्रगतीशील शहराच्या जवळ व वसई विरार शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या,पालघर तालुक्यातील,ग्रामीण आदिवासी समाजाची, स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षानंतर हि एवढी दैयनीय व बिकट अवस्था,हि मनाला चटका देऊन जाते.
यामुळे,प्रस्थापित पक्ष व स्थानिक नेते मंडळीच्या,आदिवासी समाजाच्या प्रती,विकासाच्या व शैक्षणिक प्रगतीच्या संदर्भात असलेल्या उदासीनतेमुळे, आदिवासी समाजातील शेकडो तरुणांनी,वंचित बहुजन आघाडीचे,राष्ट्रीय अध्यक्ष व प्रणेते,श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, उपेक्षित समाजाप्रती असलेली कळकळ,संवेदना व गरीब,शोषित,पीडितांना न्याय व सन्मान प्राप्त मिळवून देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे,वंचित बहुजन आघाडी,पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
मा.साईनाथ खासे,मा.नरेंद्र शनिवार,मा.रामचंद्र उमतोल,मा. महेंद्र खासे,मा.संतोष शनवार,मा.
जयवंत शनवार,मा.अजय खासे, मा.संदेश उमतोल,मा.विश्वास लाजर,मा.राजेश लाजर,मा. कृष्णा शनवार,मा.चंद्रकांत लाजर,मा.संदीप हाठल.मा.मधुकर शनवार,मा.विठ्ठल शनवार,मा.निलेश लाजर,मा.राजु लाजर,मा.पिंटू लाजर,मा.गोटू लाजर व इतर अशी शेकडो कार्यकर्त्यांची नांवे आहेत.याच,महिन्यात,तेथे, वंचितची गांव शाखा हि निर्माण करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडी,पालघर जिल्हयामध्ये,काही दिवसापासून,रोजच शेकडो आदिवासी,ओबिसी,मराठा,
मुस्लिम,उत्तर भारतीय तरुण कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश होत असल्यामुळे ,पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण झाले आहे,
यामुळे,पालघर जिल्हयामध्ये, येणाऱ्या महानगर पालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूकांमधे,वंचित बहुजन आघाडी,प्रस्थापित पक्षाची व त्यांच्या नेत्यांची झोप उडवल्या शिवाय गप्प बसणार नाही ,असे भाकीत,पालघर जिल्हा अध्यक्ष,मा.हर्षद खंडागळे यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी,आपले मनोगत व्यक्त करताना केले.
शेवटी, सर्व आदिवासी समाजातील तरुण कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.