
दि मुक्ता एज्युकेशन ट्रस्ट ,विरार यांच्या मार्फत जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गरीब आदिवासी गावांचा शोध घेतला अशी गावे निवडण्यात आली की त्यांच्याकडे जाण्यासाठी रस्ताच नाही मुख्य रस्त्यापासून एक तास डोंगरावरून गावात पोहोचण्यास लागते पायवाटेने जातांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ,ती गावं आहेत हुंबरण, ओझर-कुंदपाडा, खारोंडा,मुलीला,पिंपळशेत, जाऊन त्या त्या गावातील ग्रामस्थांना एकत्र करून ह्या गावातील अडचणी समजून घेतल्या व आपल्याला काय करता येईल ते ठरवले व कामाला लागले, दि १५/०८/२०२१ हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो त्याच दिवशी जंगलात वास्तव्य करून राहण्यास गेलेले आदिवासी कुटुंबासाठी दि मुक्ता एज्युकेशन ट्रस्ट च्या माध्यमातून शहरातील उच्चभ्रू वर्गाला आवाहन केले व त्यांच्याकडून वापरून झालेले लहान- मोठ्यांचे कपडे गोळा केले ते ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांनी स्वतः धुऊन इस्त्री करून व काही शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बुट-चपला, वह्या, पेन,पेन्सिल, शापनर, खोडरबर , ड्रॉईंग बुक,कलरपेन, पट्टी, अशा साहित्य व गावातील बहुसंख्य आदिवासी महिलांना साड्या, मुलांना कपडे, मोठ्या मुलींसाठी ड्रेस, पुरूषांचे टिशर्ट ,पँट, शर्ट असे साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
हुंबरण शाळेतील एका प्रशिक्षकाला प्रिंटर व इंटरनेट कनेक्शन सुविधा करून दिली जणेकरून गरीब आदिवासी मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी अडचण येणार नाही.
या वाटपाचा कार्यक्रमासाठी दि मुक्ता एज्युकेशन ट्रस्ट च्या अध्यक्षा डॉ.दिपा वर्मा तसेच त्यांचे कार्यकर्ते सिध्देश माणगावकर, विद्युत चोघळा, विकास गुप्ता, मंदार म्हसकर, वसंत भवर , दिनेश जाधव साहेब. दिनकर टोपले. विनोद शेंडे. दिपक शेंडे. बाळुराम शेंडे. चंद्रकांत भोये. सुनिल टोपले. परशुराम जाधव. अंबादास कोंब. विष्णु हांडवा. विष्णु खरपडे. विष्णु जाधव. कृष्णा शेंडे. संजय दिवा, आतिष सातवी, रवि सुतार यांनी पार पाडली.

