
दिनांक २५ ऑगस्ट रोजी वर्षावास कार्यक्रम २०२१ राहुल बुध्द विहार आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र आयोजित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा चे आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मा. श्री. मिलिंद रूपचंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनाची सुरूवात तंबाखुमूक्त ची शपथ देऊन करण्यात आली तसेच तंबाखूमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सेगरट, ) तंबाखू च्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन व तंबाखू च्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही या वर्षी ची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.
देशात प्रत्येक 16 सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा 5,500 मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे. असे सांगण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमात याप्रसंगी सपना खंडारे, सुमित सरवदे, मधुकर ससाणे, कृष्णाबाई ससाणे, वंदना पलघामोल, श्री. हिरामण खंडागळे यांनी राहुल बुध्द विहारात उपस्थितांनाचे आभार मानले व बुध्द वंदनाने कार्यक्रमाने समारोप झाला