
प्रतिनिधी :
अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून ही पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी चौकशी चालू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला अटक केली जाईलच, असे पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.
या बाबत अधिक माहिती अशी की, अर्नाळा येथील एक तरुण अभिषेक संतोष तामोरे याने पीडित तरुणीशी साखरपुडा केल्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जात असे. संधीचा फायदा उठवित तरुणाने तिच्यावर शारीरिक संबंधाकरिता दबाव आणून ऑगस्ट २०१८ ते जुलै २०२१ दरम्यान अनेकदा शारीरिक संबंध ठेऊन नंतर पीडित मुलीला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर पळून गेला. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दि. १७/७/२०२१ रोजी अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला अद्याप ही आरोपीला अटक झालेली नाही.