वसई प्रतिनिधी
वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आजपर्यंत कोणतेही चांगला निर्णय घेतल्याचे निदर्शनास आलेले नव्हते परंतु त्यांनी कनिष्ठ अभियंता, ठेका विभाग याला मनपाच्या सेवेतून कमी करून चांगला निर्णय घेतल्यामुळे नीलेश वर्तक यांनी आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले. मनपा आयुक्तांनी स्वरूप खानोलकरांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी व यात गुंतलेले असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वर्तक यांनी केलेली आहे.
आर टी आय निलेश वर्तक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई विरार शहर मनपा क्षेत्रात अनधिकृत बांधकामांची संख्या 9हजार पर्यंत पोहोचलेली आहे हे उच्च न्यायालय द्वारे नागरिकांना समजले. त्यानंतर मनपा आयुक्तांनी सफाई अभियान सोडून अनेक सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्याचा इशारा दिला व अनधिकृत बांधकामांना घरपट्टी लावणे बंद केले व जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी लावली. स्वरूप खानोलकर यांनी प्रभाग जी मधील उद्यान विभागात बदली झाल्यानंतर जबाबदारीने काम केले नाही. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या अधिनस्थ कर आकारणी व संकलन विभागात बदली केली तिथे समाधानकारक काम नाही.त्या दरम्यान अनधिकृत बांधकाम विभागात काम करत होते परंतु अनधिकृत बांधकाम थांबवीण्यात खानोलकर अपयशी ठरले.खानोलकरानच्या बेजबाबदार कृत्यामुळे 4 फेब्रुवारी 2021 च्या आदेशान्वये एस टी पी बोळींज येथे बदली करण्यात आली त्याठिकाणीही त्यांनी आपल्या कामात लक्ष दिले नाही म्हणून 26-8-2021 पासून खानोलकरांना मनपा सेवेतून कमी केले. परंतु या कामचलाऊ कारवाईने करदाता खुश नाही म्हणून लाच लुचपत विभागामार्फत स्वरूप खानोलकर यांची चौकशी करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ता निलेश वर्तक यांनी केली आहे. असे अनेक असंख्य स्वरूप खानोलकर मनपात कार्यरत आहेत त्यांची ची माहिती गोळा करण्यासाठी लाच लुचपत विभागामार्फत चौकशी करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. जर मनपाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली नाही तर मी स्वतः तक्रार दाखल करणार असे वर्तक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *