
हजारो नागरिकांनी मोफत तपासण्या व मोफत औषधांचे घेतले लाभ
वसई प्रतिनिधी : देशभरात कोविंड-१९ चे भयानक संकट असताना, सदर कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने देशातील लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. देशावर आलेल्या संकटसमयी दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने तसेच स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आपला देश आपली जबाबदारी आहे या एकमेव उद्देशाने दलित पॅंथर वसई तालुक्याचे अध्यक्ष पॅंथर हरेश गणपत मोहिते यांच्या विद्यमाने तसेच जय भीम मित्र मंडळ आंबेडकर नगर आगाशी अध्यक्ष रत्नाकर वागळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वागळे व महादेव देवराव, सतीश जाधव यांच्या सहकार्याने विरार पश्चिम आगाशी येथे जनतेच्या मागणीनुसार महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तज्ञ डॉ स्वाती मोरे , पन्नालाल मोर्या यांच्या उपस्थितीमध्ये हजारो नागरिकांच्या विविध मोफत तपासण्या व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच सॅनिटायझर , मास्क व सोशल सोशल डिस्टंसिंगचा योग्य वापर करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.
यावेळी संघटनेचे केंद्रीय जेष्ठ नेते प्रशांत नांदगावकर , महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत , पालघर जिल्हाध्यक्ष जगदीश राऊत , पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष पँथर बिंबेश जाधव , पालघर जिल्हा कार्याध्यक्ष पँथर अरशद खान, पालघर जिल्हा महासचिव तथा पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पॅंथर संतोष कांबळे , पालघर जिल्हा उपाध्यक्ष लहानु डोबा , चेतन जाधव , रोहित चौधरी , भावेश दिवेकर , महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी जाधव , जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई मोरे , युवा जिल्हाध्यक्ष तथा कवी ऍड पॅंथर अजिंक्य मस्के , युवा जिल्हा उपाध्यक्ष हितेश कुर्ले , पालघर जिल्हा सहसचिव तथा सहसंपर्कप्रमुख शिवप्रसाद कांबळे, जिल्हा प्रमुख सल्लागार सदाशिव ग्यारे , दिवाकर जाधव , चंद्रसेन ठाकूर , गणेश राऊत , जव्हार मोखाडा संपर्कप्रमुख वसीम काजी ,जव्हार मुखडा सहसंपर्कप्रमुख इरफान शेख, मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा, जव्हार तालुका अध्यक्ष नितीन मुरथडे , डहाणू तालुकाध्यक्ष तथा डहाणू व तलासरी तालुका संपर्कप्रमुख विनायक जाधव, डहाणू तालुका उपाध्यक्ष दीपक जाधव, पालघर तालुका उपाध्यक्ष अहमद खान , पालघर तालुका सहसचिव योगेश राऊत, सागर पात्रे ,दिनकर वानखेडे , पालघर तालुका महिला उपाध्यक्ष शालिनी वानखेडे , सुधाम सर्जेराव सफाळे विभाग कार्यकारणी सुदाम सर्जेराव , सफाळा शहर अध्यक्ष गोविंदा बोराडे , सफाळा शहर उपाध्यक्ष विजय कांबळे , सफाळा शहर कार्यकारणी सदाशिव मोरे , सफाळा विभाग कार्यकारणी अशोक निकम , सफाळे विभाग सहसचिव जयेश जाधव , सफाळे शहर महिलाध्यक्षा नेत्रा कांबळे , सफाळे शहर उपाध्यक्षा पूनम बोराडे, सफाळे शहर कार्यकारणी सुचिता येवले , सफाळे विभाग कार्यकारणी विकास मोरे , उसरणी शाखाध्यक्ष सुरेंद्र मोरे , उसरणी शाखा कार्यकारणी आदर्श मोरे ,परणाली विभाग प्रमुख प्रविन संखे , सातपाटी विभाग प्रमुख प्रवीण पाटील, नालासोपारा शहर अध्यक्ष मो.फैयाज शेख तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.