
◆ उत्तम कुमार यांचे चिपळूणकरांनी मानले आभार
चिपळूण : भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी चिपळूण पूरग्रस्तांना श्री गणेशाच्या मूर्ती देण्याचा संकल्प केल्याप्रमाणे श्री गणेशाच्या मूर्तींचा ट्रक विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून ट्रक रवाना करण्यात आला. चिपळूण येथील ब्राम्हण सहाय्यक संघाच्या सभागृहाशेजारील विरेश्वर मंदिरात चिपळूण पूरग्रस्तांना या श्री गणेशाच्या मुर्त्या नागरिकांना सुपूर्त केल्या यावेळी उत्तम कुमार यांचे चिपळूनकरांनी आभार मानले. वसई-विरारकरांनी दिलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीं व जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक बुधवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी चिपळूण येथे दाखल झाला. यावेळी चिपळूण भाजपाने मूर्ती वाटपासाठीची तयारी केली होती. धडक कामगार युनियनकडूनही श्री गणेशाच्या मुर्त्या अभिजीत राणे यांनी उत्तम कुमार यांच्याकडे सुपूर्त केल्या.
उत्तम कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, पूरग्रस्तांना गणेशमूर्तीची अडचण होणार हे लक्षात येताच. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून व आमदार प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या श्री गणेशाच्या मुर्त्या देण्यासाठी येथे आलो असून. वसई-विरारकरांना आम्ही गणेश मूर्ती देण्याचे आवाहन केले होते. त्यास वसई-विरारकरांनी भरघोस प्रतिसाद देत अनेक भाजपा पदाधिकारी, संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन ही मदत केल्याने हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे उत्तम कुमार यांनी सांगितले.
चिपळूण येथे उत्तम कुमार यांच्यासोबत यावेळी वसईवरून धडक कामगार युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, वसई रोड मंडळचे महासचिव रमेश पांडे, युवा जिल्हा सचिव राहुल पांडे, युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष ऋषी वोरणी, स्थानिक भाजपाचे भरत जाधव आदी उपस्थित होते. तर, चिपळूण भाजपाकडून जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोजने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, शहराध्यक्ष आशिष खातू, मंदार कदम, परेश चितळे, जिल्हा सदस्य दिपाशेठ देवळेकर, कामगार आघाडी संयोजक विनोद कदम, अमित पाटणकर, सूरज पेठकर, सुनील खरात, तालुका उपाध्यक्ष संदीप सुखधरे व मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरीक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.