
वसई-विरार महापालिकेच्या एका प्रभारी अधिकाराने सुट्टीच्या दिवशी कार्यालयात जाऊन कागदपत्राची हाताळणी केली त्यानंतर पोत्यात कार्यालयातील काही वस्तू चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. याप्रकरणी आयुक्तांनी त्यांना ताबडतोब निलंबित करून सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. थॉमस रॉड्रीग्ज असे या कथित प्रभारी अधिकारी चे नाव आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती आय वसई येथील कार्यालयात रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी विनापरवानगी घरपट्टी विभागातील कागदपत्राची हाताळणी केली.तदनंतर एका पांढर्या रंगाच्या पोत्यात भरून कार्यालयातील वस्तू विना परवानगी घेऊन गेले होते या प्रकरणाची माहिती मिळताच आयुक्त गंगाधरण डी. यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले होते सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी कार्यालयात करीत असलेला संशयास्पद प्रकार समोर आला आहे याप्रकरणी आयुक्तांनी रॉड्रीग्ज यांना निलंबित केले आहे तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे सध्या रॉड्रीग्ज त्यांना सर्व चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान वसई-विरार महापालिकेतील घरपट्टी विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत बेकायदा बांधकामांना घरपट्टी लावण्यासाठी अक्षरशः लुबाडणूक केली जात असल्याची आरोप केला जातो नेमक्या रॉड्रिग्ज यांनी घरपट्टी विभागातील कागदपत्रांची हाताने करून काही वस्तू चोरून नेण्याचे उद्दिष्ट आले आहेत रोड्रिक सुट्टीच्या दिवशी कुणाच्या परवानगीने कार्यालयात गेले त्यांनी कोणाच्या वस्तू चोरीले रॉड्रीग्ज यांच्या या चोरीची अनेक दिवस चर्चा असताना वसई प्रभाग समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांना त्यांच्या दखल का घेतली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे रॉड्रीग्ज तत्कालीन नवघर-माणिकपुर मधील कर्मचारी असून सध्या महापालिकेच्या विविध विभागात नवघर-माणिकपुर मधील कर्मचारी अधिका-यांच्या लॉबीचे वर्चस्व आहे महापालिकेतील वरिष्ठ लिपिक लिपिक सहाय्यक आयुक्त यांच्यासह अनेकांच्या बदलांची मध्ये याच लॉबीचा हस्तक्षेप असतो याच लॉबीने रॉड्रीग्ज प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते. आयुक्तांनी चौकशी सुरू केली असली तरी नवघर-माणिकपुर ची लॉबी रॉड्रीग्ज यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असलेले प्रयत्न पाहता चौकशी तुन काही निष्पन्न का असाही प्रश्न मुख्यालयात चर्चिला जात आहे.