
तर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि वसईचे सुपुत्र दिवंगत रॉबी डिसिल्वा ज्यांना इंग्लंडच्या राजघराण्याकडून FCSD पदवी देऊन केले होते. हा सन्मान प्राप्त करणारे रॉबी डिसिल्वा हे एकमेव आशियाई होते. ज्यांनी सर जे जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये अर्धवेळ शिक्षण करून महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा पराक्रम केला होता. परदेशात जाहिरात क्षेत्रात काम करून १९६० नंतर भारतात परतून डिजिटल डिझायनींग सर्वप्रथम भारतात आणून पुढे २० ते २५ वर्षे भारतात जाहिरात क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे होते. त्यामुळेच त्यांना अनेक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेल्या दिवंगत रॉबी डिसिल्वा आणि न्यू इंग्लिश स्कुलच्या माजी शिक्षिका तथा श्रमिक महिला विकास संघ आणि मैत्रेयी महिला सहकारी पतपेढीच्या संस्थापिका दिवंगत इंदूताई बर्वे यांना शनिवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी पापडी, वसई येथील बसीन कॅथॉलिक जिमखान्याच्या हॉलमध्ये विविध मान्यवरांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेची सुरुवात पापडी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर जॉन फरगोस आणि श्रमिक महिला विकास संघाच्या अध्यक्षा श्रीमती उषा मणेरीकर यांच्याहस्ते दोन्ही दिवंगत मान्यवरांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी सर जे जे स्कुल ऑफ आर्टचे माजी विभागप्रमुख शिल्पकार मधुकर वंजारी, जेष्ठ समाजसेविका जयश्री सामंत, बसीन कॅथॉलिक बँकेचे माजी उपाध्यक्ष ख्रिस्तोफर रॉड्रीग्ज, जेष्ठ चित्रकार ताठ जाहिरात क्षेत्रातील सुभाष गोंधळे, जेष्ठ चित्रकार फिलिप डिमेलो आणि साहित्य कला अकादमी पुरस्कार विजेते जेष्ठ शिल्पकार सचिन चौधरी या या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शब्दसुमनांनी दिवनगतांना श्रद्धांजली वाहिली.
या सभेस अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आजारी असल्याने फोनवरून आशीर्वाद दिले आणि श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध जेष्ठ लेखिका विणा गव्हाणकर यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन तथा उपस्थित मान्यवरांकडून आलेल्या सूचनेनुसार वसईत दिवंगत रॉबी डिसिल्वा यांच्या नावाने वसईत साहित्य व कला दालन उभारण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती आयोजक समीर सुभाष वर्तक यांनी दिली. तसेच वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या संदेशाचे वाचन डेरीक फूर्ट्याडो यांनी केले.
विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीतील या श्रद्धांजली सभेचे दोन्ही समितीतर्फे आयोजन करणारे समीर सुभाष वर्तक यांनी सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक मॅकेन्झी डाबरे आणि फारूक मुल्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले.