*राजकीय स्वार्थासाठी पाण्याचे राजकारण
*नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका
* महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश

मा. विवेक भाऊ पंडित यांनी
आज वसई तालुक्यातील आपल्या शासकीय दौरात वसईतील, आश्रमशाळा, वसतिगृह, रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनहक्क दावे, अनधिकृत बांधकामे, पाणी आदी विषयांवर महानगर पालिका कार्यालयात सभा घेतली. यावेळी महानगर पालिका आयुक्त, महानगर पालिका अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्याधिकारी, जीवन प्राधिकरण, कृषी आदी अधिकारी उपस्थित होते.

विविध विभागांचा आढावा घेताना महानगर पालिकेच्या रिक्त पदे न भरता, कंत्राटी पद्धतीने भरती करून पालिकेला लुटणाऱ्या धोरणावर तशोरे ओढले. महानगर पालिकामध्ये फक्त अनुसूचित जाती – जमातीचे ६०० पेक्षा जास्त जागा राज्य शासनाने मंजूर करूनही मागील ५ वर्षांपासून रिक्त असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

वसईतील ६९ गावाच्या पाणी प्रश्नाबाबत २०११ पासून पाण्याच्या टाकी व पाईप लाईन टाकून तयार होती. त्यावेळी जीवन प्राधिकरण पाणी देण्यासाठी तयार असताना महानगर पालिकेकडून पाणीवाटप मध्ये सुसूत्रता आसावी या हट्टापायी पाणीवाटप आपल्याकडे जबरदस्तीने मागून घेतले व आज ८ वर्ष पूर्ण होवूनही पाणी मिळत नसल्यानं महानगर पालिका अधिकारीची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली.

महानगर पालिकेने दिरंगाई मान्य करताना, रस्ते खोदताना, फोन, इंटरनेट वायर टाकताना पाइप लाइन तुटणे, १० वर्ष दुर्लक्ष झाल्याने पाइप खराब झाल्याचे सांगितले. त्यावेळी ८५ कोटी खर्च असलेली योजना आता २०० कोटी झाल्याचे सांगितले. इतकी तरतूद करताना समस्या येत असल्याचे नवीन पाइप लाइन जोडणी व पाणीपुरवठा यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले.

महानगर पालिकेच्या अक्षम्य चुकीचा त्रास ६९ गावातील नागरिकांना होत असून त्याच्या आरोग्याशी खेळ होत असल्याबाबत मा. भाऊंनी नाराजी व्यक्त करत पुढील महिन्याभरात याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले

मा. मुख्यमंत्री व राज्य शासन जनतेच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असताना वसई महानगर पालिका मात्र राज्य शासनाचे लोकोपयोगी निर्णय बासनात गुंडाळून ठेकेदार व ठेकेदारांना पोसण्यासाठी राबत असल्याचे आजच्या सभेत दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed