
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती आय हद्दीत सागर शेत पेट्रोल पंपानजिक पेट्रोल पंपच्या मालकाकडून अनधिकृत गाळे बनविण्यात आले असून सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास महानगरपालिका प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त प्रताप कोळी यांनी मोठा झोल केला आहे. मग ते कारवाई कशी काय करणार?
वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती आय हद्दीत सागर शेत पेट्रोल पंपानजिक पेट्रोल पंपच्या मालकाने अनधिकृत गाळ्यांचे केलेले बांधकाम निष्कासित करणेबाबत भारतीय जनता पार्टी वसई शहर सरचिटणीस अमित पवार यांनी प्रभाग समिती आय कार्यालयाला पत्र दिले होते. सदर बांधकाम प्रकरणी पेट्रोल पंप मालक यांना कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. सदर प्रकरणी अमित पवार हे सातत्याने पत्रव्यवहार करीत असून सहाय्यक आयुक्त प्रताप कोळी कारवाईस टाळाटाळ करीत आहेत. प्रताप कोळी यांनी मोठा आर्थिक व्यवहार केला असून त्यामुळे कारवाई करीत नाहीत.