विरार(जयंती पिलाने) विरार मधील बरफपाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरच मनपाद्वारे डपिंग ग्राउंड तर,तयार करण्यात आले नाही ना? असा प्रश्न निर्माण व्हावा, असा कचरा पसरलेला दिसत असल्याने, येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात विरार पूर्वेकडील बरफ पाडा येथे रस्त्यावरच कचरा रस्त्यावर पसरलेला दिसतो. बरफपाडा हे गाव, वसई-विरार शहर महापालिकेच्या हद्दीतील वॉर्ड नंबर १ मध्ये येत असुन गेल्या काही वर्षांत येथील चाळीच्या वसाहतीत मोठया संख्येने नागरिक रहावयास आले आहेत.

तथापि ज्या प्रमाणात येथील नागरिकांना मनपाद्वारे सुविधा मिळणे आवश्यक आहेत, त्या अपुऱ्या असल्याचे दिसून येते. शिवाय नागरी आरोग्य बाबतीत स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन यंत्रणा सक्रिय नसल्याचे,अशा प्रकारे आज नागरिकांना कचऱ्याच्या रस्त्यावरुन मार्ग काढत ये जा करावी लागत असल्याचे स्थानिकांचे ,म्हणणे आहे.

महापालिका येथील सोयी सुविधे बाबतीत घरपट्टी आणि इतर सर्व टॅक्स नियमित वसुल करते,आणि यंदा तर मोठ्या प्रमाणात तो वसुल झाल्याचे सांगितले जाते, मात्र या परिसरातील अशा प्रकारच्या नागरिकांच्या आरोग्य बाबतीत मनपा प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *