
पालघर, दि. 30- पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्हा परिषदेमधील 15 निवडणूक विभाग व पंचायत समित्यांमधील 14 निर्वाचक गणातील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवणूकीचे मतदान मंगळवार दि.5 ऑक्टोबर 2021 व मतमोजणी बुधवार दि.6 ऑक्टोबर 2021 राजी होणार आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी पालघर डॉ. किरण महाजन, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यक्षेत्राकरीता पालघर जिल्हयातील पालघर जिल्हा परिषदेमधील 15 निवडणूक विभाग व पंचायत समित्यांमधील 14 निर्वाचक गणातील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचे अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेले विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी मतदार तसेच अंध व अपंग मतदार यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशीर जमावास मतदान केंद्राचे सभोवताली व मतमोजणीचे ठिकाणाचे सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम 144 (1) (2) (3) अन्वये मतदानाच्या दिवशी मंगळवार दिनांक 05/10/2021 रोजी 00.00 वा. पासून ते 24.00 वाजेपावेतो तसेच मतमोजणीच्या दिवशी बुधवार दिनांक 06/10/2021 रोजी 00.00 वा. पासून ते 24.00 वाजेपर्यंतचे कालावधीत प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
00000