
माननीय न्यायाधिश श्री. डी.एच.केळुसकर अध्यक्ष, विधी सेवा समिती पालघर यांच्या हस्ते “आजादीका अमृत महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
संपूर्ण देशामध्ये दिनांक २ आॅक्टोंबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान “आजादीका अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे.
पालघर न्यायालयातील शुभारंभ प्रसंगी माननीय न्यायाधिश श्री.डी.एच केळुसकर साहेबांनी उपस्थितांना महोत्सवाचे महत्व तसेच आपला सहभाग,याबद्दल मार्गदर्शन केले.या प्रसंगी कायदेविषयक जनजागृतीसाठी पथनाट्ये, कायदेविषयक शिबीरांचे आयोजन तळागाळापर्यंत “न्याय सर्वांसाठी” हि संकल्पना राबवावी असे आवाहन केळुसकर साहेबांनी केले.
तदनंतर सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विधी स्वंयसेवकांनी महिलांवरील अत्याचार व यासंबंधित कायद्यांबाबत जनजागृती साठी पथनाट्ये सादर केली.
या कार्यक्रमाच्या वेळी पालघर न्यायालयातील माननीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्री. डी.एच केळुसकर, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर श्री.एच.एच.चेंडके, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री वि.प्र खंदारे व श्रीमती एस.एच.तेलगावकर.
पालघर बार असो.चे अध्यक्ष श्री.संजय पाटील,उपाध्यक्ष श्री सुरेश महाडिक व इतर पदाधिकारी आणि वकिल मंडळी, विधी सेवा समितीचे पॅनल वकिल सदस्य,सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विधी स्वंयसेवक
तसेच पालघर न्यायालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सांगता हि पालघर न्यायालय ते हुतात्मा स्मारक दरम्यान जनजागृती रॅली काढून करण्यात आली.
