

जगाला अहिंसेचा आणि शांततेचा संदेश देणारे, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन आपल्या भारत देशाला मुक्त करणारे आणि अन्यायाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढणाऱ्या तरुणांचे मार्गदर्शक राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक अश्या पवित्र वैतरणा संगमाच्या स्मृती स्थळावर जाऊन (जेथे महात्मा गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन झाले होते.) त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी पुष्प अर्पण करून वंदन केले.
यावेळी “दि अर्नाळा फिशेरमन सर्वोदय सहकारी सोसायटीचे संचालक, वसई तालुका मासेमारी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष आणि ख्रिश्चन गावकीचे पाटील मा. इनास डेडु, वाघोलीचे माजी सरपंच मा. टोनी डाबरे माझे सहकारी अभिजित घाग आणि कुंदन नाईक हेही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना वंदन करण्यासाठी उपस्थित होते.