



दि. २८जून २०१९,
विधान परिषदेच्या उपसभासभापती सौ. निलमताई गोर्हे ह्यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झालेल्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक बैठकीत डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेला पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली ह्या बैठकीला संस्थेतर्फे संस्थेच्या महिला संघटक व प्रतिनिधी सौ. रुत लिंगायत , सहसचिव श्री प्रथमेश प्रभूतेंडोलकर ह्यांनी हजेरी लावली.
दुपारी ३ः३० वाजता विधिमंडळातील दालनात आयोजित केलेल्या ह्या बैठकीत अनेक प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पहाटेच्या आणि रात्रीच्या गाड्यांच्या महिलांच्या डब्यात नियमितपणे सुरक्षा रक्षक नसणे, निर्भयाफंडातून मंजूर झालेले CCTV कँमेरे अजूनही वैतरणा ते डहाणू ह्या स्थानकांवर न लावणे, मेल एक्सप्रेस गाड्यांतून फलाटांवर फेकल्या जाणाऱ्या मद्याच्या बाटल्या व तत्सम पदार्थांमूळे ओढवलेले अपघात, तसेच वैतरणाच्या खाडीत फेकल्या जाणाऱ्या निर्माल्यामूळे नजिकच्या काळात झालेले अपघात ह्या मुद्यांकडे संस्थेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांचे व सभेचे लक्ष वेधले.
वरिष्ठ पोलीस आधिकार्यांनीही सर्व मुद्यांबद्दल विचारपुस करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
बैठक संपल्यानंतर डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने विधानपरिषदेच्या उपसभापती सौ. निलमताई गोर्हे ह्यांची स्वतंत्र भेट घेऊन उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व महाराष्ट्र राज्य अस्मिता योजनेची व्याप्ती वाढवून जिल्हापरीषद शाळेतील विद्यार्थींनींना सवलतीने मिळणाऱ्या सँनिटरी पँड्स संदर्भातील योजना पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधूनही लागू करावी ह्या विषयी निवेदन दिले.