
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन देवराजन यांची अखेर बदली झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्या जागी महापालिकचे नवे प्रशासक व आयुक्त म्हणून अनिल पवार हे कार्यभार सांभाळणार आहेत.
सिडको प्रशासनात वरिष्ठ पदावर असलेले अनिल पवार आता वसई-विरार महापालिका प्रशासनाचे सेनापती म्हणून यापुढे काम पाहणार असल्याचे समजते. मध्यंतरी अनिल पवार यांची महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागणार, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र आता प्रत्यक्षात त्यांची वर्णी वसई-विरार शहर महापालिकेच्या आयुक्तपदी लागली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.