
७ ऑक्टोबर, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गासाठी, दुसरे १ दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम कृपा फाउंडेशन, पापडी वसई येथे आयोजित करण्यात आला. सध्याच्या काळात व्यसनाधीनता आणि व्यसनाच्या समस्या आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे आणि आणि ह्या विषयाचे प्रशिक्षण ही काळाची गरज आहे असे श्री प्रदीप गिरीधर, सहाय्यक पोलिक आयुक्त हे शिबिर संबोधित करताना बोलत होते.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला १ ऑक्टोबर रोजी वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त विशेष उपक्रम राबवावे म्हणून वसईचे पोलीस उपायुक्त श्री संजयकुमार पाटील ह्यांनी पुढाकार घेउन कृपा फाउंडेशनशी संपर्क साधून एकूण ४ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे आणि आज दुसरे प्रशिक्षण शिबीर होत असून ह्यात एकूण ३५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते, व सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आहे सदर कार्यक्रमासाठी कृपा फाउंडेशन चे व्यस्थापकीय विश्वस्त फा. कॅजेटीन मॅनेजिझ सुद्धा उपस्थित होते.
कृपा फाउंडेशन ही संस्था सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांसाठी राज्यस्तरीय समन्वय संस्था म्हणून कार्य करीत असून विविध गटांसाठी नियमित विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित करीत असते, सदर प्रशिक्षण शिबिरात, पॉवरपॉइंट सादरीकरण, व्हिडिओ, आणि प्रश्न उत्तर पद्धतीचा वापर करून प्रशिक्षण देण्यात आले, व सहभाग्यान कढून प्रश्नावली सुद्धा भरून घेण्यात आल्या, सदर प्रशिक्षणात डॉ. राणी बदलांनी, श्री. समीर पाटील, श्री. अमित पटेल, व श्री. गणेश तरडे ह्यानी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी, वसई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे व पोलिक उपनिरीक्षक विनोद वाघ ह्याचे विशेष प्रयत्न केले.

