अर्ज भरण्यास अडचणी आल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधणे – विजय खेतले


Covid-19 काळात टाळेबंदी मुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद होता राज्य शासनाने यासाठी पंधराशे रुपये अनुदान जाहीर केले होते. त्या अनुषंगाने अनेक रिक्षाचालकांनी पंधराशे रुपये अनुदानासाठी अर्ज भरले होते काहींना अनुदान मिळाले आहे मात्र अद्यापही काही रिक्षाचालक अनुदानापासून वंचित आहेत .तर अनेकांनी अर्ज भरलेले नाहीत. सुरुवातीला अनुदानासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ठरलेली नव्हती. पंधराशे रुपये अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाने आता 31 ऑक्टोबर 2021 ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व रिक्षाचालकांनी पंधराशे रुपये अनुदानासाठी आपला अर्ज ऑनलाईन भरावा असे आवाहन ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघाचे अध्यक्ष विजय Khetale यांनी केले आहे. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी याबाबतची संपूर्ण माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई दशरथ वाघुले यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली . तसेच ज्या रिक्षाचालकांना अर्ज करण्यास अडचणी येत असतील व काही अडचणीमुळे त्यांना अनुदान मिळाले नसेल त्यांनी कार्यालयीन वेळेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई येथील अधिकार्‍यांशी संपर्क साधावा त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल असे उपप्रादेशिक परिवहनआधिकारी दशरथ वाघुले यांनी महासंघाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ज्या रिक्षाचालकांनी पंधराशे रुपये अनुदानासाठी अर्ज भरलेले नाहीत व ज्यांना काही अडचणी येत आहेत वvज्यांनी अर्ज भरून सुद्धा अध्याप त्यांना अनुदान मिळाले नाही अशा रिक्षाचालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन विजय खेतले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *