नालासोपारा :- भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या धर्तीवर वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही ‘अभय योजना 2020-21’ लागू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे पंकज देशमुख यांनी मागणी पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.

या योजनेमुळे मालमत्तेवरील कर एकरकमी भरल्यास मालमत्ताधारकांना 100 टक्के व्याज माफी मिळू शकेल. शिवाय पालिकेचा मुख्य उत्पन्न स्रोत असलेल्या मालमत्ता करातही वाढ होऊ शकेल, अशी आशा देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पालिका क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या मिळकतीवरील मालमत्ता कराची वसुली करण्याच्या दृष्टीने अधिनियमाच्या तरतूदीनुसार अनुसूचित ‘ड’चे प्रकरण 8 ( कराधान नियम)मधील नियम- 51, मालमत्ताधारकांना व्याज माफी अभय योजना 2020-21 टप्पा- 2 मुदतवाढ 3 लागू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत मालमत्तेवरील कर एकरकमी भरल्यास 100 टक्के व्याज माफी करण्यात येऊ शकते. तसेच मोठ्या इमातीमधील सदनिका /गाळे धारकांना एकूण थकबाक़ीपैकी त्यांच्या हिशाची पूर्ण रक्कम एकरकमी भरण्याच्या अटीवर अभय योजनेचा लाभ देता येऊ शकेल, अशी सूचना पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *