
कोलेजचे माझं शिक्षण पूर्ण केल्यावर आमच्या घरातील कार चालवायला शिकायची ओढ बरीच होती त्यावेळी माझे वडिलांशी (चंद्रकांत कदम सर ) मी हट्ट धरला त्यावेळी त्यांनी मला 140 पानाचं एक पुस्तक वाचायला दिला तो पुस्तक पाहून मी बराच वेळ विचार करत होतो कारण त्या पुस्तकात गाडी कशी चालवावी याचा अ देखील नव्हता पण भारतातील व जगातील वाहतुकीचे नियम होते अर्थात मी माझ्या वडिलांना विचारलं त्यावर त्यांनी उत्तर दिल गाडी चालवण्यापेक्षा महत्वाचे आहे गाडी चालण्याचे नियम
म्हणून आपण आज भारतात व जगभरातील वाहतूक कायद्याचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया अमेरिका, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा देश. पण, इथे वाहन चालवताना, वाहकांना ‘मेरी मर्जी’ करून चालत नाही. इथे वाहतुकीचे नियम कडकच आहेत. विना सीटबेल्ट वाहन चालवले तर इथे भारतीय चलनानुसार १८ हजार रुपये इतका दंड भरावा लागतो. विनापरवाना वाहन चालवले तर ७२ हजार रुपये दंड भरावा लागतो. विनाहेल्मेट असाल तर २२ हजार रुपये दंड भरावा लागेल. वाहन चालवताना फोनवर बोलताना आढळल्यास तब्बल ७.२३ लाख रुपये भरावे लागतात. आता कुणी म्हणेल की, इथे डॉलर चालतो. पण, डॉलरचा हिशोब रुपयांत केला तर इतक्या रुपयांचा दंड इथे भरावाच लागेल. इतका दंड भरावा लागणार असल्याने इथले वाहनचालक सावध न राहतील तर नवलच! सिंगापूरला फिरायला जाणे, हे काही सामान्य भारतीयांसाठी आता अप्रूप राहिलेले नाही. या सिंगापूरमध्येही विनापरवाना गाडी चालवली तर ३ लाख रुपये दंड आहे, विना सीटबेल्ट गाडी चालवली तर आठ हजार रुपये दंड आहे. नशेत वाहन चालवले तर पहिल्यांदा ३ महिने कारावास आणि ३.५९ लाख रुपयांचा दंड आहे. दुसर्यांदा हाच गुन्हा केला तर दंड ७ लाख रुपये आहे. सिंगापूरमध्येही वाहन चालवताना फोनवर बोलल्यास ७२ हजार रुपये दंड आहे. रशिया आणि दुबई येथेही वाहन कायदा आहे. मात्र, इथे एक कायदा वेगळा आहे. या दोन देशांमध्ये वाहन जर अस्वच्छ आणि तुटकेफुटके असेल तर त्याबाबतही वाहनचालकास दंड भरावा लागतो. रशियामध्ये भारतीय चलनानुसार ३,२४० रुपये तर दुबईमध्ये यासाठी दहा हजार रुपये दंड भरावा लागतो. तैवान हा तर चिमुकला देश. मात्र, इथेही नशेमध्ये वाहन चालवल्यास चार लाख रुपये दंड आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये जर वाहतूक नियम तोडले आणि तो कुणीही असला तरी त्या वाहकास ५० कोडे मारले जातात. या सगळ्या कायद्यांमध्ये हॉलंडचा कायदा तसा जबरदस्तच. इथे वाहनचालकाने वेगमर्यादा ओलांडली, तर त्याचे वाहन कायमचे जप्त केले जाते. शिस्तप्रिय जपानमध्ये तर पादचार्यांची विशेष काळजी घेतली जाते. रस्त्यात कुठेही चिखलाचे पाणी साचले असेल आणि एखाद्या वाहनामुळे हेच गढूळ पाणी पादचार्याच्या अंगावर उडाले, तर त्या वाहनचालकास दंड भरावा लागतो. फिनलँड हा एकमात्र असा देश आहे की, जिथे गरीबांसाठी वेगळा वाहतूक दंड आणि श्रीमंतांसाठी वेगळा वाहतूक दंड आहे..