
‘
शिवसेना युवा नेते पंकज देशमुख यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान
प्रतिनिधी
विरार- कोविड-१९ चे संक्रमण, विविध आजारांच्या निमित्ताने रक्ताची लागणारी ग़रज लक्षात घेता राज्य सरकारने केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून केलेले ‘रक्तदान शिबिरा’चे आयोजन कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, अशा शब्दात शिवसेना युवा नेते पंकज देशमुख यांनी ‘जॉयव्हिला’ संकुलातील रहिवाशांचे कौतुक केले.
‘रक्तदान हेच महादान’ असा संकल्प करून स्वैच्छिक रक्तदानाला प्रोत्साहन देण्याकरता विरार-पश्चिम-नानभाट येथील ‘जॉयव्हिला’ या रहिवाशी संकुलात रविवारी सकाळी ११ ते ५ या वेळात ‘रक्तदान शिबिरा’चे आयोजन केले होते.
या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून पंकज देशमुख उपस्थित होते. रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा मान दिल्याबद्दल देशमुख यांनी आयोजकांचे आभार मानले.