
वसई : धडक ऑटो रिक्शा-टॅक्सी चालक मालक युनियनच्या राधा नगर मच्छिमार्केट स्टँडचे कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उत्साहात उदघाटन पार पडले. यावेळी युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार, जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, वसई-विरार सचिव रमेश पांडे, वसई-विरार सचिव उदय शेट्टी आदी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रिक्षा युनिटच्या अध्यक्ष शलाका नागवेकर यांनी पाहुण्यांचा शाल व श्रीफळ घालून सत्कार केला.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, रिक्षा चालकांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नसून युनियन तुम्हा सर्वांच्या पाठीशी उभी आहे. असे म्हणाले.
उत्तम कुमार यांनी बोलताना, युनियनचे वसईत कार्यालय असून युनियन आपल्यासाठी सदैव गरजेला उपस्थित राहणार व हीच आमच्या युनियनची ताकद आहे असे म्हणाले.
उदय शेट्टी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली व त्यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांनी वेळात वेळ कडून आल्याबद्दल आभार मानले.
युनिटचे पदाधिकारी संदीप हंबीर उपाध्यक्ष, संतोष घाटाळ सचिव, गौरी रहाटे खजिनदार, सोमनाथ तरे सहसचिव, प्रदीप पोटले सहखजिनदार, कार्यकारिणी सदस्य दीप्ती मोरे, कमलेश पांचाळ व सदस्य गणेश रहाटे, महेश बाबर, विकी बाबर, प्रशांत जाधव, अविनाश अहिरे, पवन मानके, मंगेश पवार, प्रवीण आदमाने आदी उपस्थित होते.