
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत मोबाईल टॉवर असून सदर मोबाईलवर महानगरपालिका प्रशासनाने निष्कासन कारवाई करून गुन्हे दाखल करावेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत मोबाईल टॉवर असून सदर मोबाईल टॉवर उभारताना मोबाईल कंपन्यांनी महानगरपालिका कार्यालयाकडून कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही. वास्तविक मोबाईल टॉवर उभारताना महानगरपालिका तसेच तत्सम प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र मोबाईल कंपन्यांनी नियम पायदळी तुडवून मोबाइल टॉवर उभारलेले आहेत जे बेकायदेशीर आहे. मोबाईल कंपन्या या टॉवरकरिता सोसायट्यांना हजारो रुपये भाडे देतात. मोबाईल टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. मात्र सदर बाबत कोणाला काही सोयरसुतक नसून महानगरपालिका अधिकाऱ्यांना ही या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या बदल्यात पैसे मिळत असावेत म्हणूनच अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. तरी महानगरपालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करून मोबाईल टॉवर कंपनी मालक व मोबाईल टॉवर उभारण्यात आलेल्या सोसायट्यांवर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करावी.
