
मुठ्ठी में कुछ सपने लेकर, भरकर जेबों में आशाएं ।
दिल में है अरमान यही, कुछ कर जाएं… कुछ कर जाएं…।
सूरज-सा तेज़ नहीं मुझमें, दीपक-सा जलता देखोगे..
सूरज-सा तेज़ नहीं मुझमें, दीपक-सा जलता देखोगे…
अपनी हद रौशन करने से,
तुम मुझको कब तक रोकोगे…
तुम मुझको कब तक रोकोगे…
विकास बंसल यांची ही कविता. यूट्यूबवर आपण ही कविता महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकतो तेव्हा स्वयंप्रेरणा मिळते. त्यातला प्रत्येक शब्द न शब्द आपण आपल्यासोबत ताडून पहायला लागतो. या प्रत्येक शब्दातला संघर्ष आपला वाटायला लागतो.
सामाजिक-राजकीय वर्तुळात अपवाद वगळता या कवितेला साजेशी व्यक्तिमत्त्व सहसा नाहीत. वसईतील राजकारणात ही व्यक्ती प्रतीक चौधरी यांच्यानिमित्ताने मात्र आपल्याला भेटते. या कवितेच्या ओळी जितक्या सहज आपल्या मनाला भिड़तात; तितक्याच सहजतेने प्रतीक चौधरी यांची मैत्री, त्यांचा स्वभाव आणि त्यांचा संघर्ष आपल्या मनाला भिड़तो. तितक्याच प्रखरतेने ते विरोधकांनाही भिड़तात.
प्रतीक चौधरी वसई भाजपचे युवा कार्यकर्ते आहेत. भलेही ते अनेक पक्षांतून येऊन भाजपमध्ये स्थिरावले असतील; तर त्यात वावगं ते काय? एखाद्या ठिकाणी ज्ञान वृद्धि होत नसेल; आपल्या प्रतिभेला वाव मिळत नसेल, आपल्या मतांचा आदर होत नसेल; तर अशा ठिकाणी कदापि थांबू नये, असं चाणक्य सांगतो. प्रतीक या नीतीला अपवाद ठरत नाहीत. म्हणूनच वसईच्या राजकारणात ते आपली वेगळी ओळख ठेवून आहेत. आपला पक्ष, त्याची विचारधारा यांच्याशी बंधिलकी ठेवून आहेत.
केवळ पद-प्रतिष्ठा यांच्या मागे न लागता, सो कॉल्ड नेतेगिरी न करता आपल्या भिडस्त स्वभावाने ते आपल्या विरोधकांचा तितक्याच बिनधास्तपणे समाचारही घेतात. वसई-विरारच्या राजकीय घडामोड़ीशी संलग्न एखाद्या व्हाट्सएप ग्रूपवर असाल तर या ‘राजकीय योद्धा’च्या भिडस्तपणाची आपल्याला प्रचितीही येईल.
वसई-विरार महापालिका हद्दिल अनेक समस्या, जनतेशी संलग्न प्रश्न यांना समोर आणून वेळप्रसंगी त्याला जबाबदार अधिकारी आणि विकासाचे ‘क्रेडिट’ घेणाऱ्या लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची धमकही प्रतीक चौधरी यांनी दाखवलेली आहे.
पक्षाच्या प्रत्येक कामात कार्यकर्ता म्हणून प्रतीक चौधरी जितके पुढे असतात; तितक्याच खंबीरपणे हा युवा जनेतेच्या आणि आपल्या मित्रांच्या मदतीकरता पाय रोवून त्यांच्यासोबत उभा असतो. वेळप्रसंगी आपल्या खिशातून मदत करतो. पण राजकीय पटलावर याचा फायदा घ्यावा, असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. याच निस्वार्थ स्वभावामुळे त्यांच्या शब्दाला मान देणारे आणि त्यांच्यातील नेतृत्वगुण मान्य करणारे वसईत अनेक जण आहेत.
प्रतीक चौधरी हे उभरते युवा नेतृत्त्व आहे. प्रतीक चौधरी यांचे विचार, त्यांचा भिडस्त स्वभाव आणि संघर्ष पाहता कदाचित त्यांना रोखण्याची हिम्मत कुणीच करणार नाही. आज या युवा नेतृत्त्वाचा वाढदिवस….! आई जीवदानी त्यांची ही राजकीय वाटचाल अधिक प्रशस्त करो. जनसेवेकरता त्यांना उदंड आयुष्य मिळो!! ही प्रार्थना!