
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अमन पैलेस इमारतीवरील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करून एमआरटीपीन्वये गुन्हा दाखल करावा. या अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे जीवन व आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी आरोग्याबाबत तक्रारी केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अमन पैलेस इमारतीवर अवैध मोबाईल टॉवर लावण्यात आलेला आहे. इमारतीवर वा कुठेही मोबाईल टॉवर लावताना सर्व त्या कायदेशीर बाबी पूर्ण करणे आवश्यक असताना कोणतीही परवानगी न घेता अवैध रित्या मोबाईल टॉवर लावले जातात. सदर प्रकरणी महानगरपालिकेकडे तक्रारी दिल्या तरी कोणतीही कारवाई होत नाही. कारण अंदाधुंद भ्रष्टाचार… सदर मोबाईल टॉवरवर कारवाई करण्याबाबत महानगरपालिका कार्यालयाकडे तक्रार देण्यात आली आहे. महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी.