
दिनांक 27/10/2021 रोजी वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्षा गीता जाधव यांनी माननीय आयुक्त गंगाथरण डी. यांचे भेट घेऊन जनतेचे चार मुख्य प्रश्न मांडलेआयुक्तांनी आपले चार विषय शांत पने ऐकून घेतले
1, भरत कूवरा ला कामावरून काढल्या बद्दल
2, विरार मध्ये प्रसूती गृह
3, कुत्र्यांसाठी नसबंदी शस्त्रक्रिया हॉस्पिटल
4, घरपट्टी वसूल करताना नागरीकांबरोबर केला जाणारा दुरव्यव्हार.

1) भरत कुवरा हे वंचित बहुजन आघाडीचे वसई तालुका अध्यक्ष आहेत. तरी त्यांनी तिल्लेर व भाताने गणातून नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये दोन उमेदवार दिले होते. त्या वेळेस ज्या ठिकाणी भरत कुवरा काम करतात तेथील वसई विकास आघाडीतील लोकांनी त्याला धमकी दिली की तू आमच्या कडे काम करतो आणि प्रचार वंचित बहुजन आघाडी चा करतो. तु सिट मागे घे आणि प्रचार थांबावं. त्याने ते जुमानले नाही आणि भरत कुवरा ला कामावरून काढण्यात आले
2) आपल्याला माहीतच असेल सर्वसामान्यांना परवडणारे वसई विरार मध्ये कमी प्रसूती ग्रह आहेत आणि त्यात चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट, व हवी तशी यंत्रणा नसल्याने महिलांचे हाल होतात . यात आयुक्त यांनी हमी दिली की लवकरच हा विषय ते हाताळतील.
3) कुत्र्याच्या वाढत्या संख्या बघता हे समजून येते की वसई मधील असलेले नसबंदी चे हॉस्पिटल यंत्रणा आणि जागा कमी पडत आहे तर अजून विरार येथेही असेच आणि मोठे हॉस्पिटल असावे… त्याबद्दल ही आयुक्तांनी आशेची किरण दाखवली आहे.
4) घरपट्टी वसूल करताना कर्मचाऱ्याचा अतिरेकी पणा आणि नागरिकांना बरोबर दूरव्यवहार. तरी आयुक्तांनी यात लक्ष घालतील ही अपेक्षा बाळगतो..