
प्रतिनिधी – दिवाळी या सणाची सर्वच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. काहीच दिवसांवर असलेली ही दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या गेल्या असतात. त्यातीलच एक म्हणजे किल्ले बांधण्याची जुनी प्रथा. लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी होतात आणि अनेक ठिकाणी दिवाळीच्या एक आठवड्यापूर्वी किल्ले बांधणीच्या कामला सुरुवात होते.
गावराईपाडा येथील रोशनी गंगाधर घरत यांनी दिवाळी निमित्ताने आपल्या घराबाहेरील पटांगणात जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. गेली १० दिवसांपासून त्यांनी प्रतिकृती तयार करण्यासाठी मेहनत घेतली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांनी हा दुर्ग किल्ला अद्याप प्रत्यक्षात पाहिला देखील नाही. समाजमाध्यामावर मिळणाऱ्या माहिती आधारे व दुर्गमित्रंच्या अनुभवाची माहिती घेत रोशनी यांनी बालगोपाल मंडळींना सोबत घेऊन किल्ला बांधणी केली आहे.
जंजिरा किल्ला हा अभेद्य व अजिंक्य असा असून या किल्ल्याला सर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्या पैकीच स्वराज्यातील एका युवकाने लयाजी पाटील यांनी शिडा ताटाला बांधून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेळेत मदत न पोहचल्याने त्यांना मोहीम अर्धवट सोडून द्यावी लागली, छ शिवाजी महाराज यांना याची माहिती मिळताच त्यांनी लयाजी पाटील यांना पालखीचा मान दिला. छ संभाजी राजे यांनी देखील डोंगर फोडून खाडी बुजवन्याचा प्रयत्न केला परंतु स्वराज्यावर त्यावेळी औरंगजेब चाल करून आल्याने छ संभाजी राजे यांना ही मोहीम अर्धवट सोडून द्यावी लागली. यांचे रीतसर प्रतिकृती यावर रोशनी यांनी दर्शिवल्या आहेत.
आपल्या इतिहासाची साक्ष देत परंपरेचं पालन करत दिवाळी सणात गड किल्ले बांधायची प्रथा चालू आहे याने आपल्या भावी पिढीला प्रेरणादायी विचार मिळत असल्याचे मत रोशनी घरत यांनी व्यक्त केले.