प्रतिनिधी:
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील पोमण ग्राम पंचायत हद्दीत पोमण भूमापन क्र. १९९ उप विभाग क्र. १, भूमापन क्र. ८ उप विभाग क्र. १, भूमापन क्र. ९ या भूखंडावर यासिन भाई चोटालिया व मदन गोपाळ शेठ यांनी प्रचंड अनधिकृत बांधकामे केली असून सदर बांधकामे निष्कासित करून एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील वसई तालुका अंतर्गत पोमण ग्राम पंचायत हद्दीत पोमण भूमापन क्र. १९९ उप विभाग क्र. १, भूमापन क्र. ८ उप विभाग क्र. १, भूमापन क्र. ९ या भूखंडावर यासिन भाई चोटालिया व मदन गोपाळ शेठ यांनी प्रचंड अनधिकृत बांधकामे केली आहेत. सदरची बांधकामे निष्कासित करून बांधकामधारकांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दि. २५/११/२०२० रोजी दाखल तक्रारीवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदरची तक्रार वसई तहसील कार्यालयास पाठविण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. सदर बाबत लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडून सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार व शिस्तभंगाची कारवाई व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *