


प्रतिनिधी :
वसईविरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी हद्दीत वसंत नागरी परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा तसेच नागरिकांना रहदारीस ही अडथळा निर्माण होतो. या फेरिवाल्यांवर प्रशासनाने कारवाई करावी.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसईविरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी हद्दीत वसंत नागरी परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले अवैधरित्या सार्वजनिक रस्त्यांवर बसून फेरीचा धंदा लावतात. महानगरपालिका या फेरीवाल्यांकडून बाजार कर वसुली करते. या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांची वेगळी अवैध वसुली असते. या फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी या करिता नागरिक वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करतात. मात्र प्रशासन या तक्रारींकडे कानाडोळा करून फेरीवाल्यांकडून लाच खाऊन फेरीवाल्यांना संरक्षण देते. प्रभाग समिती डी कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रतेश किणी हे फेरीवाल्यांना का हटवत नाहीत? त्यांना या फेरीवाल्यांकडून किती आर्थिक लाभ होतो. वाहतूक शाखेकडून ही फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या आर्थिक लाभामुळेच फेरिवाल्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.