
मागील दिड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त आहे. लाॅकडाउन आणि सोशल डिस्टसशिंग सारख्या माध्यमाच्या सहाय्याने या महामारीचा सामना करीत आहे. शासनाच्या नियमानुसार सख्य महिला मार्गदर्शन केंद्राने देखील आॅनलाइन पध्दतीने आपले समुपदेशन सेवा, प्रशिक्षण कार्यक्रम व इतर कामे सुरू ठेवली होते शिवाय मदत कार्य देखील सुरूच होते. याकाळात संस्थेऩे आॅनलाइन पध्दतीने महिलांसाठी कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणा-या सेवा व योजनांची माहिती देणारे मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले होते आणि इंग्रजी भाषैची ओळख व्हावी यासाठी मिस. आयुषी व मिस् . एहसानात या वाॅलेटीयरसऀच्या मदतीने इंग्लिश लिटरेसीचे दोन कार्यक्रम राबविले गेले. यासर्व कार्यक्रमात उत्स्फूर्त पणे सहभागी झालेल्या करीता संस्थेने २९ आॅक्टोबरला दिवाळी मेळाव्याचे आयोजन केले होते तसेच या कार्यक्रमात वालीव पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी श्री. निकम व श्री.शिंदे यांनी मार्गदर्शन केले तर निर्मळ पोस्ट आॅफीसच्या जान्हवी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या विद्या ताई आणि हाॅली क्रास शाळेच्या शिक्षिका रूबी डाबरे ह्यांनी दिवाळी सणाचे महत्व सांगितले. दिवाळी मेळाव्याचे औचित्य साधून प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मौजमजा व पारंपरिक नृत्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


